Saturday, April 15, 2017

My eMrunmai app

https://play.google.com/store/apps/details?id=com.emrunmai
Download eMrunmai application through playstore

Wednesday, March 29, 2017

माणिक पैंजण..

  विस्मरणात गेलेला एक सुंदर पदार्थ. नावही किती गोड!
करायलाही सोप्पा. उरलेली भाकरी कुस्करून ताकात भिजवून ठेवायची, तिखट,मीठ,थोडीशी साखर घालून वर लसूण मिरची व जिरं मोहरीची फोडणी द्यायची.
  माझ्या लहानपणी  भाकरी दगडी खलबत्त्यात कुठली जायची.
आता मिक्सर आहे मदतीसाठी.
कुठल्या भागातील हा पदार्थ आहे हे मला माहीत नाही.
आज अचानक आठवला म्हणून शेअर करतेय.

सुषमा कुलकर्णी
मृण्मयी रेसिपीज
दम बिर्याणी
साहित्य - 600 ग्रॅम चिकन धुवून घेतलेलं, 250 ग्रॅम बासमती तांदूळ, दीड चमचा आलं लसून पेस्ट,6 हिरव्या मिरच्या,400 ग्रॅम दही, 3 कांदे उभे चिरलेले, अर्धा कप कोथिंम्बीर चिरलेली,अर्धा कप पुदिना चिरलेला, खडा मसाला - 10 वेलदोडे, 8 लवंगा,5 मोठे वेलदोडे, 2 जायपत्री,2 चुटकी केसर,ऑरेंज कलर खायचा, मीठ,तूप 5 चमचे, शाही बिर्याणी मसाला, चिकन मसाला पावडर,तिखट,हळद अर्धा चमचा

सुरवातीला चिकन 1 तास मॅरीनेट करण्यासाठी घ्या.एका मोठ्या भांड्यात धुवून घेतलेल चिकन घ्या, चिकन च्या फोडी मोठ्या असाव्यात, शक्यतो लेग पीस वापरा, त्यात आता दही घाला , आलं लसूण पेस्ट घाला,त्यावर मिरची पावडर म्हणजेच तिखट,मीठ 1 छोटा चमचा, हळद,शाही बिर्याणी मसाला,चिकन मसाला पावडर,मिरच्या उभी चीर देऊन घाला, 1 वाटी कोथिंबीर आहे त्यातली अर्धी वाटी कोथिंबीर घाला, अर्धीवाटी पुदिना मधलं निम्मा चिरलेला पुदिना घाला,खडा मसाला जो वर घेतलाय त्यातला अर्धा अर्धा घाला सगळे जिन्नस , ते घालताना थोडेसे बत्यात चेचून घाला (अगदी बारीक नाही कारायच) आता हे सगळं हातानं एकसारखं मिक्स करा आणि झाकून फ्रिज मध्ये ठेवून द्या तासभर.
तांदूळ एका भांड्यात पाणी घालून भिजवून ठेवा।

आता गॅस वर छोटी कढई ठेवून तेल टाकून कांदे चिरलेके सोनेरी रंगावर तळून घ्या, गॅस मोठा ठेवायंचा कांदे 3 वेळा थोडे थोडे तळून घ्यायचे, एकदम सगळा कांदा तळायचा नाही.
तो बाजूला ठेवून द्या.

आता एका मोठ्या पातेल्यात सव्वा लिटर पाणी उकळायला ठेवा, त्या पाण्यात मघाशी उरलेला खडा मसाला टाका, आता त्यात भिजवून ठेवलेले तांदूळ घाला त्यात एक चमचा तूप घाला आणि त्याला एक चांगली उकळी येऊद्या.४०% भात शिजवून घ्यायचाय.आता या भातातले पाणी चाळण लावून काढून टाका,भात मोकळा करून घ्या.

आता एक मोठा पॅन घ्या , त्यात मॅरीनेट साठी ठेवलेलं चिकन काढून घ्या आणि ते पॅन मध्ये खाली सगळं व्यवस्थित पसरून घ्या, पॅनचा तळ कुठं दिसता कामा नये असं व्यवस्थित एकसारखं पसरून घ्या आता त्यावर एक चमचा तूप टाका, तळून ठेवलेला कांदा, थोडी कोथिंबीर आणि थोडा पुदिना पसरून टाका त्यावर आता थोडा भात पसरून घ्या ,साधारण निम्मा,पुन्हा 1 चमचा तूप टाका, वर कांदा, कोथिंबीर,पुदिना पसरून घ्या, परत वर उरलेला भात पसरून टाका,आता यावर उरलेला कांदा,कोथिंबीर,पुदिना टाकून तूप सगळीकडे पसरून टाका, अर्ध्या भागावर ऑरेंज कलर टाका, अर्ध्या भागावर केशरच्या दुधाचे पिवळसर थेम्ब टाका,आता पॅन ला टोपण लावा,आता या पॅन ला गव्हाची कणिक लावून टोपण सील करून टाका जेणे करून कुठूनही वाफ बाहेर जाणार नाही
आता हा तयार झालेला पॅन गॅस वर ठेवून 15 मिनिट मध्यम आचेवर शिजू द्या मग 10 मिनिटांनी अगदी बारीक गॅस करा,आता सपाट तवा घ्या तो गॅस वर गरम करायला ठेवा, त्यावर आता पॅन उचलून ठेवायचा तव्यावर, आणि 5 मिनिट गॅस मध्यम परत 10 मिनिटांनी गॅस अगदी कमी करायचा असं 15 मिनिट तव्यावर पॅन राहूदे.
आणि मग गॅस बंद करून पॅन उतरून घ्या
तुमची बिर्याणी तयार 👍 पण आता पॅन ची कणिक सुरीने शिस्तीत काढून टाका, वाफ अंगावर येणार नाही याची काळजी घ्या
तुमची स्वादिष्ट बिर्याणी तयार झाली की बाकी कुणाला सांगायची गरज राहात नाही की तुम्ही काय बनवलंय, आता खायला घ्या
आणि जमलंच तर एक सेल्फी काढून मला पाठवून द्या 😊
        - सविता सतिश शिंदे
              मृण्मयी रेसिपीज